उल्हासनगरात चंद्रशेखर आझाद यांच्या नावाने उत्तर भारतीय भवन

उल्हासनगरात चंद्रशेखर आझाद यांच्या नावाने उत्तर भारतीय भवन

उल्हासनगर, ता. १ (वार्ताहर) : क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद यांच्या नावाने उल्हासनगरात उत्तर भारतीय भवन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भूखंड उपलब्ध करून देण्यासोबत भवन उभारण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे.
शहरात हजारोंच्या संख्येने उत्तर भारतीय हिंदी भाषिक राहतात. त्यांच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमासाठी एकही उत्तर भारतीय भवन नाही. त्यामुळे उल्हासनगरात भवन उभारण्यात यावे, त्यासाठी म्हारळ सर्व्हे क्र.५३ अँटिलिया जवळील भूखंड आणि पाच कोटीचा निधी द्यावा, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर महाराज आणि हिंदी भाषा फाऊंडेशनसह अनेक सामाजिक संस्था आणि इतर उत्तर भारतीय समाज संघटना यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. उत्तरभारतीय व हिंदी भाषिकांची निकड बघून डॉ. शिंदे यांनी भूखंड व पाच कोटींचा निधी देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
राजेंद्रसिंह भुल्लर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली उत्तरभारतीय भवनाचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, हिंदी भाषा फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष पांडे, युवासेना कल्याण जिल्हा सचिव हरजिंदरसिंग भुल्लर, सुरेश चौहान, महेश यादव, प्रमोद पांडे, नितू विश्वकर्मा उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com