रेल्वे प्रवाशांना लुटणारे दोघे इराणी अटकेत

रेल्वे प्रवाशांना लुटणारे दोघे इराणी अटकेत

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १ : एक्स्प्रेस, लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर फटका मारत त्यांच्याकडील मोबाईल, पर्स लंपास करणाऱ्या दोघा इराणी चोरट्यांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद अब्बास समीर सय्यद (१९) आणि मोहम्मद अली हुमायून जाफरी (१९) अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे दोघेही इराणी वस्तीत राहणारे आहेत. तर कारवाई दरम्यान तीन आरोपींनी पळ काढला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
कल्याण ते टिटवाळा रेल्वे स्थानकादरम्यान मेल एक्स्प्रेस, लोकल याच्या दारात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातातील मोबाईल, पर्स चोरीचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहे. ठराविक ठिकाणी या चोरीच्या घटना घडत असून पोलिस या चोरट्यांचा शोध घेत होते. गाडीचा वेग कमी झाल्यास प्रवाशांच्या हातावर लाकडी बांबू किंवा लोखंडी सळईने जोराचा फटका देऊन चोरटे त्यांच्या हातातील वस्तू खाली पाडतात. गाडी धावती असल्याने गाडीतील प्रवासी सामान खाली पडले तरी काही करु शकत नाहीत. त्यामुळे अशा गुन्ह्यांत वाढ झाल्याने अशा त्याला आळा घालण्यासाठी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मुकेश ढगे आणि रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस निरिक्षक सुनील शर्मा यांनी दोन्ही यंत्रणांचे स्वतंत्र तपास पथक तयार केले. तब्बल २५ जणांच्या पथकाने कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशन परिसरात चार दिवसांपासून सापळा लावला होता. या सापळ्यात मोहम्मद सय्यद आणि मोहम्मद जाफरी हे दोन्ही चोरटे अडकले. मात्र काळोख असल्याने अन्य तिघांनी जवळच्या जंगलात पळ काढला. यातील मोहम्मद सय्यद आणि मोहम्मद जाफरी यांना अटक करण्यात आली आहे. चौकशीत या दोघांनी मोबाईल चोरीच्या दोन गुन्ह्याची कबुली दिल्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मुकेश ढगे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com