चाकूच्या धाकाने ऐवज चोरला

चाकूच्या धाकाने ऐवज चोरला

भिवंडी, ता. १ (बातमीदार) : शहरातील शांतीनगर भागातील भुसावळ कंपाऊंडजवळ साठ फुटी रोडने दुचाकीवरून जाणाऱ्या मोहम्मद साजिद नसीमुद्दीन अन्सारी याला काही जणांनी अडवले. त्यानंतर त्याला चाकूचा धाक दाखवत खिशातील १० हजार रुपये रोख, एटीएम कार्ड व मोबाईल असा एकूण ३० हजार रुपयांचा ऐवज जबरीने काढून घेतला. ही घटना १३ मार्च रोजी घडली असून त्याची फिर्याद शांतीनगर पोलिस ठाण्यात शनिवारी देण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश बडाख हे करीत आहेत.
----------------------------
काल्हेरमध्ये घरफोडी
भिवंडी (बातमीदार): तालुक्यातील काल्हेर गावात शिवाजी चौकात असलेल्या रखुमाई प्लाझा मध्ये भरदिवसा घरफोडी करून ६४ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. रखुमाई प्लाझामध्ये तिसऱ्या मजल्यावर राहणारे आशिष हरिचंद्र शिंदे हे नोकरी निमित्ताने बाहेर गेले असता त्यांच्या घराची कडी तोडून घरात ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६४ हजाराचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी शिंदे यांनी नारपोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com