कर्नाळा सहकारी बँकेच्या सीईओंना न्यायालयीन कोठडी

कर्नाळा सहकारी बँकेच्या सीईओंना न्यायालयीन कोठडी

पनवेल, ता. १ (बातमीदार) : कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे २२ संचालक, ५९ ओड कर्जधारक आणि दोन सीईओ यांच्यावर ५५३ कोटी ३२ लाख रकमेचा अपहार आणि सभासद व ठेवीदारांची; तसेच सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात सीईओ अपर्णा वडके यांना २४ एप्रिलला आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली होती. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी (ता. २९) पुन्हा सुनावली झाली, तेव्हा त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे आता इतर संचालकांचे धाबे दणाणले असून, अभिजीत पाटील यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
कर्नाळा नागरी सहकारी बँकेत केलेल्या ५१२.५० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी शेकापचे माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यासह बँकेच्या संचालक मंडळांतील २२ सदस्य आणि इतर अशा एकूण ८३ जणांवर पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे जवळपास ५१२. ५० कोटींचे कर्ज काढल्याप्रकरणी सहकार खात्याच्या तक्रारीवरून १७ फेब्रुवारीला जिल्हा विशेष लेखा परिक्षक उमेश गोपीनाथ तुपे यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये विवेक पाटील यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून ते तळोजा कारागृहात आहेत.
अपर्णा वडके या बँकेच्या सीईओ असल्याने आणि त्यांनी बँकेच्या मुख्य व्यवस्थापक म्हणून काम केल्याने त्यांना बँकेच्या आर्थिक व्यवहाराबद्दल पूर्ण माहिती होती. त्यामुळे बँकेच्या बनावट कर्ज प्रकरणामध्ये अवैध येणारी रक्कम कोठून आणि कोणत्या माध्यमातून येत होती. ती कोण वापरत होते, याची माहिती असल्याने त्याचा तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपअधीक्षक एम. एस. जगताप यांनी २४ एप्रिलला त्यांना अटक केली. त्यांना अटक झाल्याने इतर संचालकांचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अभिजीत विवेक पाटील यांनीही अटक पूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, अपर्णा वडके यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com