वसईत दंतचिकित्सा शिबिर उत्साहात

वसईत दंतचिकित्सा शिबिर उत्साहात

वसई (बातमीदार) : शिवसेना ठाकरे गटातर्फे डॉ. सुपर्ण केळकर यांच्या सहकार्याने दंतचिकित्सा तपासणी शिबिर वसई पश्चिम येथील ६० फूट रोड येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात इंट्रोरल कॅमेरा, डिजिटल एक्स-रे मशिनद्वारे रुग्णांच्या दातांची तपासणी करून त्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण यांनी दिली. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख उमेश शिखरे, महिला उपशहर संघटक प्रतिभा ठाकूर, शाखाप्रमुख सुशांत धुळप, नितीन देसाई, उपविभागप्रमुख प्रसाद वर्तक, शाखाप्रमुख सुरेंद्र लक्षरी, शाखाप्रमुख बलदेव कलसी, विभा दुबे, शीतल सिंग यांनी विशेष प्रयत्न केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com