वाहन चालकांच्या खिशाला कात्री

वाहन चालकांच्या खिशाला कात्री

बदलापूर, ता. १ (बातमीदार) : महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. यातच आता मध्य रेल्वेने खासगी ठेकेदारांना दिलेल्या पार्किंगच्या दरात एक मेपासून दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बदलापूरमधील वाहन चालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. सध्या दुचाकी वाहनांना साधारण बारा तासांसाठी वीस रुपये द्यावे लागतात, त्यानंतर पुढील २४ तासांपर्यंत वाहन पार्किंग करायचे असेल, तर तीस रुपये द्यावे लागत होते; मात्र १ मेपासूनच किमान पार्किंगचे दर ३० रुपये केले असून, यामुळे रोजच्या रेल्वेच्या तिकीट दरापेक्षा पार्किंगचे दर बदलापुरात महागले आहेत.
मध्य रेल्वेने ठेकेदाराला दिलेल्या पार्किंगच्या दरात दहा रुपये म्हणजेच ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पार्किंगच्या या दरवाढीमुळे सर्वसामान्य वाहन चालकांचे हाल होणार आहेत. सध्या बदलापूर रेल्वे स्थानकात पूर्वेकडे रेल्वेने पार्किंगची ठेकेदारी दिलेल्या तीनही ठेकेदारांकडून एका वाहनासाठी महिन्याच्या पार्किंगचा दर हा ५०० रुपये इतका आहे; पण आता या दरात ५० टक्क्यांनी वाढ होणार आहे. बदलापूर शहरात पार्किंगची मोठी समस्या असल्याने, स्टेशनपासून लांबच्या अंतरावर राहणाऱ्या नागरिकांना सकाळी व संध्याकाळी स्टेशन ते घर हे अंतर गाठण्यासाठी स्वतःचे वाहन फायदेशीर ठरत आहे; मात्र आता पार्किंगचे दर वाढले असल्याने घर ते स्टेशन आणि स्टेशन ते घर अंतर गाठण्यासाठीच बदलापूर ते मुंबई या रेल्वे तिकिटाच्या दरापेक्षा अधिक पैसे सामान्य बदलापूरकरांना मोजावे लागणार आहेत. त्यामुळे पार्किंगची दरवाढ करू नये, अशी मागणी बदलापुरात सामान्य वाहन चालक करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com