किन्हवलीचा ऋतुराज भला जिल्ह्यात प्रथम

किन्हवलीचा ऋतुराज भला जिल्ह्यात प्रथम

किन्हवली, ता. २ (बातमीदार) : किन्हवली येथील विद्या प्रसारक मंडळाच्या शहा चंदूलाल सरूपचंद विद्यालयातील आठवीच्या वर्गातील ऋतुराज तानाजी भला याने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत अनुसूचित जमाती प्रवर्गातून ठाणे जिल्ह्यात पहिला येण्याचा बहुमान पटकावला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने फेब्रुवारी २०२३ मध्ये घेतलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत (एनएमएमएस) शहापूर तालुक्यातील ग. वि. खाडे विद्यालय या परीक्षा केंद्रात किन्हवली येथील शहा चंदूलाल सरूपचंद विद्यालयातील एकूण ५४ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील १५ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकले असून शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. ऋतुराज भला हा अनुसूचित जमाती प्रवर्गाचा विद्यार्थी ४५० विद्यार्थ्यांमधून ठाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. गुणवत्ता यादीतील प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षाला बारा हजार रुपयेप्रमाणे पाच वर्षात प्रत्येकी साठ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com