कुडूस नाक्यावरील मोऱ्यांनी मुहूर्त कधी?

कुडूस नाक्यावरील मोऱ्यांनी मुहूर्त कधी?

वाडा, ता. २ (बातमीदार) : भिवंडी वाडा मार्गावरील कुडूस नाक्यावरील मोरी अरुंद असल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे पाणी तुंबून कुडूस नाका नेहमीच पाण्याखाली जातो. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होते. यावर उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या अनेक महिन्यांपूर्वी या ठिकाणी मोऱ्या (सिमेंट पाईप) आणून ठेवल्या आहेत; मात्र त्या अद्यापपर्यंत येथे लावल्या नसल्याने यावर्षीही कुडूस नाका तुंबणार असल्याचे दिसून येत आहे.
भिवंडी-वाडा मार्गावरील कुडूस हे बाजारपेठेचे मुख्य गाव आहे. येथे शिक्षणाच्या सुविधा असल्याने लोकवस्ती वाढत आहे. या नाक्यावरील मोरी अरुंद आहे. मोरी अरुंद असल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने पाणी तुंबून कुडूस नाका पावसाळ्यात नेहमीच पाण्याखाली जातो. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी जाऊन नुकसान होत होते. यावर उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने या मोरीचे रुंदीकरण करण्याचे ठरवले असून या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यापूर्वी नवीन मोऱ्या (सिमेंट पाईप) आणून टाकले आहेत; मात्र या मोरीचे रुंदीकरण केलेले नसल्याने त्या तशाच पडून आहेत. पावसाळ्याला काही दिवस बाकी राहिलेले असताना व मोऱ्या तशाच पडून असल्याने यावर्षीही कुडूस नाका तुंबणार असल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग अद्याप व्यापाऱ्याच्या किती नुकसानीची वाट पाहत आहे, असा सवाल व्यापारी करीत आहेत.


--------------------
कुडूस नाक्याच्या ठिकाणी सिमेंट क्राँकीटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्या वेळी सिमेंटच्या मोऱ्या टाकण्यात येतील. पावसाळ्यापूर्वी हे काम करण्यात येईल.
- शशिकांत चौधरी, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, भिवंडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com