गरजू दिव्यांगांना पुन्हा वाटाण्याच्या अक्षता

गरजू दिव्यांगांना पुन्हा वाटाण्याच्या अक्षता

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : स्वारस्य अभिव्यक्ती देकार तत्वावर दिव्यांगांना सक्षम करण्याच्या उद्देशाने ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रात चहाचे स्टॉल वाटप करण्यात येणार आहेत. हे स्टॉल उभारण्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून जागा देण्यात येणार असून त्याचे संपूर्ण काम मे. टी स्टॉल ऑनर्स वेल्फेअर असोशिएशन यांना देण्यात आले आहे. या संस्थेने तयार केलेल्या लाभार्थींच्या यादीत गरजू दिव्यांगांना बाजूला सारून मर्जीतील आणि राजकीय वरदहस्त असलेल्या दिव्यांगांचाच समावेश करण्यात आला आहे, असा आरोप अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे मुख्य निमंत्रक मोहम्मद युसूफ खान यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी पालिका आयुक्तांशी पत्रव्यवहारही केला आहे.
ही योजना दिव्यांगांचा आर्थिक तथा सामाजिक विकास होण्यासाठी राबवण्यात येत असल्याने ठाणे महानगरपालिकेने याबाबत स्थानिक तथा प्रादेशिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करुन दिव्यांगांकडून अर्ज मागवण्याची गरज होती; परंतु तसे करण्यात आलेले नाही. त्यामुळे जी २०० लोकांची यादी तयार करण्यात आलेली आहे. ही यादी कंपनीच्या मर्जीतील लोकांची आहे. तसेच, काही स्वयंभू दिव्यांग नेत्यांच्या सांगण्यावरुन ठराविक लोकांना पात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे आधी तयार केलेली यादी रद्द करून नव्याने यादी जाहीर करावी, अशी मागणीही खान यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com