वसई, विरारमध्ये ई-बस धावणार

वसई, विरारमध्ये ई-बस धावणार

वसई, ता. २ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेत पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था असावी, म्हणून प्रशासनाने राज्य ते केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अधिकाऱ्यांच्या या मेहनतीला यश आले असून शहरात लवकरच ई-बस धावणार आहेत. केंद्राच्या राष्ट्रीय हवा गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत टप्प्याटप्प्याने एकूण ५७ बस दाखल होणार आहेत. एका ई-बसची किंमत साधारणपणे एक कोटी २५ लाख रुपये असणार आहे.

वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा कार्यरत असून गेली ११ वर्षे प्रवाशांना सुविधा मिळत आहे. लाखो प्रवासी याचा लाभ घेत आहेत. आता पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यासाठी प्रशासनाची लगबग सुरू आहे. बूम या तत्त्वानुसार महापालिका बस खरेदी करून ठेकेदारास चालवण्यास देते. त्यानुसार देखभाल खर्च, चालक वाहक व अन्य खर्च ठेकेदारांचा असतो; तर दुसऱ्या तत्त्वानुसार पालिका बस खरेदी करण्यासाठी कंपनीला पैसे देते, परंतु पहिल्या बूम धोरणाचा फायदा महापालिकेला होणार असल्याने प्रशासनाने विचार केला आणि केंद्र सरकारकडे अहवाल सादर केला होता; मात्र ही बाब राज्य सरकारच्या अधिपत्त्यात असून तिथे मागणी करावी, असे केंद्र सरकारने सांगितले होते.

राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव दराडे यांची आयुक्त अनिलकुमार पवार आणि आमदार क्षितिज ठाकूर यांनी प्रत्यक्ष भेट घेतली होती. बूम तत्त्वानुसार बस खरेदी करण्याची परवानगी मागितली होती. त्याला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे येत्या वर्षात महापालिकेच्या ताफ्यात रस्ते वाहतुकीला होणारे प्रदूषण पाहता पर्यावरणपूरक ११ ई-बस दाखल होणार आहेत. या धोरणामुळे महापालिकेची पुढील १० वर्षांतील ८० कोटींची बचत होणार आहे.

ई-सायकलला अनुदान
वसई, विरार शहरात वाहनांचे प्रदूषण वाढत आहे. सार्वजनिक वाहतूक पर्यावरणाला हानी पोहचवत असते. याबाबत महापालिकेने इलेक्ट्रिक वाहनांचे मिशन राबवण्याची मोहीम हाती घेतली आहे. परिवहन सेवेसोबतच महापालिकेचे कर्मचारी, नंतर रिक्षा व परिवहन विभागाला इलेक्ट्रिक वाहनांचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. तसेच इलेक्ट्रिक सायकल खरेदी केल्यावर नागरिकांना अनुदानदेखील मिळणार आहे.

इलेक्ट्रिक बससाठी केंद्र सरकारकडे मागणी केली. केंद्राच्या राष्ट्रीय हवा गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत टप्प्याटप्प्याने एकूण ५७ बस दाखल होणार आहेत. या वर्षी ११ बस येणार आहेत. कंत्राटदाराला भाडे, तसेच मार्ग प्रशासन निश्चित करून देणार आहे. नियमानुसार कार्यवाही केली जाईल.
- अनिलकुमार पवार, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका

वर्षानुसार इलेक्ट्रिक बसची संख्या
२०२३ - ११
२०२४ - ९
२०२५ - ९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com