फडके मैदानात घाणीचे साम्राज्य

फडके मैदानात घाणीचे साम्राज्य

कल्याण, ता. २ (बातमीदार) : कल्याण पश्चिमेला लाल चौकी परिसरात पालिकेचे फडके मैदान असून अनेक वेळा पालिका विविध कार्यक्रम आणि प्रदर्शनासाठी हे मैदान देत असते. मागील १५ दिवसांत तेथे कार्यक्रम संपल्यावर आयोजकांनी स्वच्छता न केल्याने त्या परिसरात जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य झाले असून तेथे येणाऱ्या नागरिकांना त्याचा चांगलाच त्रास होत आहे.
कल्याणमधील खेळाच्या मैदानामध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले असून खेळाडू आणि नागरिकांना मॉर्निंग वॉक करण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. जी मैदाने शिल्लक आहेत, त्यातही अनेक वेळा विविध कार्यक्रम होत असल्याने खेळाडूंमध्ये संतापाचे वातावरण आहे. लालचौकी परिसरात असलेल्या फडके मैदान परिसरात सकाळ-संध्याकाळच्या सत्रात अनेक नागरिक मॉर्निंग वॉकसाठी जातात; मात्र त्यांना सध्या त्या परिसरात जागोजागी पडलेल्या कचऱ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याची चर्चा आणि टिका सध्या सोशल मीडियावर होत आहे. पालिका जागेचे भाडे घेत असताना स्वच्छता का केली जात नाही, असा सवाल केला जात आहे. तक्रार करूनही पालिका प्रशासन दखल घेत नसल्याची तक्रार नागरिक करू लागले आहेत.

----------------------
मैदानाचा खेळासाठी वापर आवश्यक असताना पालिका ते विविध कार्यक्रमांसाठी देत असून स्वच्छता ठेवली जात नाही. घनकचरा विभागाचा पदभार अतुल पाटील यांनी घेतल्यापासून त्या विभागात केवळ सावळागोंधळ सुरू आहे. मैदानामधील कचरा साफ न केल्यास जनआंदोलन करू.
- मोहन उगले, माजी नगरसेवक, केडीएमसी

-----------------------
मालमत्ता विभागामार्फत फडके मैदान विविध कार्यक्रमांसाठी दिले जाते. तेथील कचरा काढण्याचीआयोजकांची जबाबदारी असून कार्यक्रम संपल्यावर स्वच्छता अधिकारी आणि प्रभाग क्षेत्र अधिकारी यांच्या एनओसी मिळाल्याशिवाय आयोजकांचे डिपॉझिट देऊ नये, असा आदेश दिला आहे. त्यामुले डिपॉझिटमधून दंड वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.
अतुल पाटील, उपायुक्त, घनकचरा विभाग, केडीएमसी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com