मुंब्र्यात वनविभागाची २५ घरांवर कारवाई

मुंब्र्यात वनविभागाची २५ घरांवर कारवाई

कळवा, ता. २ (बातमीदार) : मुंब्र्यात मुंब्रा बायपास रस्त्यावर असलेल्या आंबेडकर पाड्यात वनजमिनीवर अनधिकृतपणे बांधण्यात आलेली २५ घरे तोडण्याची कारवाई नुकतीच वन विभागाने केली आहे. तसेच इतर काही घरमालकांना दोन दिवसांत घरे खाली करण्याच्या सूचना वनविभाग अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मुंब्रा बायपास रस्त्याच्या कडेला डोंगरपायथ्याशी वन विभागाच्या जागेत आंबेडकर पाड्यात मुंब्र्यातील हरून शेख याने सातबारावर असलेल्या जागेवर ही घरे असल्याची खोटी माहिती देऊन दोन लाख घेऊन येथे झोपडपट्टी बांधून ही घरे विकली होती. मात्र या घरांचा करारनामा अजून केलेला नव्हता. शिवाय वन विभागाने या घरावर कारवाई केल्याने अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत.

------------------
आम्ही दोन लाख रुपये देऊन घरे विकत घेतली. आम्हाला या जागेचा सातबारा असल्याचे सांगितले गेले; मात्र करारनामा केलेला नव्हता. आता आम्ही बेघर झालो आहोत.
- अखतरी बानो, बेघर महिला, आंबेडकर पाडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com