महापालिकेच्या ताफ्यात सात सक्शन जेटिंग मशिन

महापालिकेच्या ताफ्यात सात सक्शन जेटिंग मशिन

वसई, ता. २ (बातमीदार) : वसई, विरार शहरातील स्वच्छतेसाठी महापालिकेने १५ व्या वित्त आयोगअंतर्गत सात नवीन सक्शन जेटिंग मशीन वाहने खरेदी केली आहेत. एकूण दहा हजार लिटरच्या चार आणि तीन हजार लिटरच्या तीन सक्शन कम जेटिंग मशीन असणाऱ्या वाहनांचे लोकार्पण महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे, उपायुक्त डॉ. किशोर गवस, उपायुक्त नयना ससाणे, उपायुक्त चारुशीला पंडित उपस्थित होत्या.

वसई, विरार शहरात गृहसंकुले वाढली आहेत. मानवी पद्धतीने मैला साफ करण्यास मज्जाव करण्यात आला असून यांत्रिकी पद्धतीला प्राधान्य दिले जात आहे. नऊ प्रभागांत मैला स्वच्छतेसाठी याचा वापर केला जाणार आहे. पावसाळ्याच्या अगोदर ही वाहने आली असल्याने गृहसंकुलातील मैला काढण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. शहरातील सेफ्टी टॅंकची साफसफाई करण्यासाठी नव्या वाहनांची भर पडल्याने याचा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com