स्कूल बसलाच आठ वर्षांची मुदत का?

स्कूल बसलाच आठ वर्षांची मुदत का?

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ ः मुंबईतील प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने डिझेलवर धावणाऱ्या स्कूल बस आठ वर्षांनंतर एक तर सीएनजीमध्ये रूपांतरित करण्याचे किंवा मुंबईबाहेर चालवण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. एसटी महामंडळासह खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस मात्र १२ ते १५ वर्षांपर्यंत मुंबईत कशा धावतात, असा प्रश्न स्कूल बस ओनर्स असोसिएशनने उपस्थित केला असून सरसकट सर्वच वाहनांना एकच नियम लावावा; अन्यथा स्कूल बसलासुद्धा सूट द्यावी, अशी मागणी स्कूल ओनर्स असोसिएशनने केली आहे.
राज्य शासनाने वर्ष २०१२ मध्ये मुंबईत डिझेलवर धावणाऱ्या स्कूल बससाठी नियम तयार करण्यात आला होता. त्याप्रमाणे मुंबईतील स्कूल बसचे आठ वर्षांनंतर परमिट संपणार असे सांगण्यात आले होते. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने बस उभ्याच असल्याने या दोन वर्षांच्या भरपाईसाठी दोन वर्षे कालमर्यादा वाढवून देण्याची मागणी ओनर्स असोसिएशनने केली आहे; मात्र त्याकडे सरकारकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया मिळत नसल्याने ओनर्स असोसिएशनकडून संताप व्यक्त केला जात आहे. वायुप्रदूषणाच्या कारणावरून स्कूल बसला जर आठ वर्षांनंतर मुंबईत प्रतिबंध घातला जात असेल, तर हा नियम इतर बसलासुद्धा लावण्यात यावा, डिझेलवर धावणाऱ्या व्होल्वो बसलासुद्धा १२ वर्षांची कालमर्यादा देण्यात आली असून खासगी बस, एसटीच्या डिझेलवरील बसलासुद्धा मुंबईत प्रतिबंध घालण्याची मागणी स्कूल बस ओनर्स असोसिएशनकडून करण्यात आली आहे.
...
कोरोनाच्या काळात एक तर स्कूल बस ओनर्सचा व्यवसाय बुडाला. त्यात स्कूल बसवरील कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचीसुद्धा सोय तेव्हा राहिली नाही. परिणामी अनेकांना कामावरून काढावे लागले आहे. त्यात दोन वर्षांची भरपाईसुद्धा राज्य सरकार देत नसल्याने स्कूल बस ओनर्स आर्थिक संकटात सापडले आहे. राज्य सरकारकडून आम्हाला सावत्र वागणूक मिळत आहे.
- अनिल गर्ग, अध्यक्ष, स्कूल बस ओनर्स असोसिएशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com