नेरूळ येथे स्वामी समर्थ दरबार

नेरूळ येथे स्वामी समर्थ दरबार

जुईनगर, ता. २ (बातमीदार) ः विश्व फाऊंडेशन शिवपुरी अक्कलकोटतर्फे १ ते ६ मेदरम्यान नेरूळ येथील रामलीला मैदानावर श्रीस्वामी समर्थ दरबार आयोजित करण्यात आला आहे. अक्कलकोटच्या गुरुमंदिरस्थित ‘अनादिअविच्छिन्न’ गुरुपीठावर विराजमान पवित्र गुरुपादुका येथे विराजमान झाल्या आहेत. या कार्यक्रमामध्ये दररोज सूर्योदय आणि सूर्यास्ताला अग्निहोत्र, ध्यान व योग प्रशिक्षण केले जात आहे. तसेच या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनावर आधारित दुर्मिळ छायाचित्रे व त्यांच्या विविध भावमुद्रांच्या तैलचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

या कार्यक्रमात वेद प्रतिपादित ‘आयुरुक्थ्यमहासोमयागा’ असे विविध धार्मिक कार्यक्रम ६ मेपर्यंत होणार असल्याचे विश्व फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांनी सांगितले. डॉ. राजीमवाले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये परम सद्गुरु श्री गजानन महाराज यांच्या पादुकांच्या पवित्र सानिध्यात हा महासोमयाग शास्त्रयुक्त पद्धतीने होत आहे. या यज्ञात प्रवर्गीय आहुती देण्यात आली. अनेक भाविकांनी यज्ञ नारायणाचे दर्शन घेतले असून नवी मुंबईसह मुंबईतील भक्तदेखील मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत, असे एस. पी. जवळकर यांनी सांगितले. यज्ञाच्या स्थळी सामूहिक अग्निहोत्र सुरू असताना अनेक भाविक सहभागी झाले होते. आमदार गणेश नाईक, माजी महापौर अशोक गावडे, माजी नगरसेवक सूरज पाटील आदींनीही दर्शन घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com