वज्रमुठ राहते कि नाही हे लवकरच कळेल

वज्रमुठ राहते कि नाही हे लवकरच कळेल
Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : कल्याण ग्रामीणमधील मलंगगड परिसरात केंद्र सरकारच्या वतीने जलजीवन मिशन या योजनेंतर्गत घराघरात नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. पहिल्यांदाच या भागातील घरांना नळाद्वारे पाणी मिळणार असून या कामाचे भूमिपूजन कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी खासदरा डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीची वज्रमूठ राहते की नाही? हे लवकरच कळेल. महाविकास आघाडीचे नेते दररोज जी वज्रमूठ दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते फक्त स्वतःच्या समाधानासाठी आणि लोकांना दाखवण्यासाठी सुरू आहे. आधी ते आमच्यावर टीका-टिप्पणी करत होते, आता एकमेकांवर करायला लागले आहेत. दुसरीकडे मात्र लोकांच्या मनातले सरकार सध्या आले असून गेल्या दहा महिन्यांत वेगवान निर्णय आणि वेगवेगळ्या पॉलिसी आणण्याचे काम या सरकारने केले आहे.

याप्रसंगी कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी ग्रामीण भागातील विकासकामांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. वरती जसे आपण काम करतो, तसे स्थानिक पातळीवरदेखील भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र काम केले पाहिजे, असे सांगितले. यावर खासदार डॉ. शिंदे यांनी त्यांच्या शैलीत उत्तर देत सांगितले, की वरच्या स्तराप्रमाणेच खालच्या स्तरावरही युती झालेली आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी डोक्यात शंका ठेवू नका, असे सांगितले. मलंगगड परिसरातील ग्रामीण भागात पहिल्यांदाच नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामीण भागात पाणीपुरवठा हा केला जाणार असून शनिवारी खासदार डॉ. शिंदे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले. या वेळी आमदार गणपत गायकवाड, ज्ञानेश्वर म्हात्रे, महेश गायकवाड, राजेश मोरे, महेश पाटील यांच्यासह शिवसेना-भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.


---------------------
अजित पवारांबद्दल मौन
अजितदादा तुमच्याकडे येणार आहेत का, असे खासदार शिंदेंना विचारले असता, मी एक छोटा कार्यकर्ता असून तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. यामध्ये मी जास्त बोलू शकत नाही. अजितदादा इकडे जातात, तिकडे जातात, अशा बातम्या मीडियावर दाखवत असून अजित दादांना तरी सांगू द्या, ते कुठे जात आहेत, असे म्हणत त्यांनी याबाबत अधिक बोलणे टाळले. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मात्र आमच्याकडे कोणीही आले तरी स्वागतच आहे, असे म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com