Heat Stroke bird
Heat Stroke birdesakal

Heat Stroke : हवेत उडताना पोटातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने पक्ष्यांना हवेतच चक्कर!

बदलत्या हवामानामुळे ऋतुचक्रातही कमालीचा बदल

वाशी : बदलत्या हवामानामुळे ऋतुचक्रातही कमालीचा बदल झाला आहे. कधी अवकाळी पाऊस, तर कधी उष्म्याचा वाढता तडाख्याने माणसांसह पक्ष्यांनाही विविध त्रास होत आहेत. वाढत्या तापमानामुळे हवेत उडताना पोटातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने आकाशातून पक्षी जमिनीवर पडण्याचे प्रकार नवी मुंबईत घडत आहेत.

नवी मुंबईतील तापमान ४० अंशावर गेले आहे. निसर्गात होणाऱ्या या बदलत्या हवामानाचा फटका पक्ष्यांना बसत असल्याचे दिसून येत आहे. उष्ण रक्ताचे असल्याने पक्ष्यांच्या शरीराचे तापमान १०४ ते १०५ पिरॅमिड अंश इतके असते. त्यामुळे शरीरातील उष्णतेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पंख पसरवून पक्षी तोंडाने श्वसनक्रिया करतात. त्यामुळे उन्हाळ्यात पक्षी चोच उघडून बसलेले नेहमीच दिसतात.

Heat Stroke bird
Birds Migration : पाणवेलींमुळे अभयारण्यातून पक्ष्यांचे स्थलांतरण

पक्ष्यांसाठी हे करा...
- पोटातील पाण्याचा अंश कमी झाल्याने हवेत उडताना पक्षी खाली कोसळतात. रस्त्यात एखादा पक्षी मूर्छित होऊन पडलेला असेल किंवा जखमी असेल, तर अशा पक्ष्यांना सावलीच्या ठिकाणी ठेवावे.
- पक्ष्यांना टरबूज किंवा कलिंगडासारखी फळे खायला द्यावीत. तसेच पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी बाल्कनी, गच्ची अथवा जिथे शक्य आहे, त्या ठिकाणी पाणवठे तयार करावे.

Heat Stroke bird
Weather Update : मोचा चक्रीवादळाचा परिणाम! राज्यात उष्णतेची लाट येणार, हवामान विभागाकडून अलर्ट

दुपारच्या वेळेत शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढत असल्याने पक्ष्यांच्या शरीराची ऊर्जा कमी होते. त्यामुळे हवेत उडताना पक्ष्यांच्या पोटातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन ते जमिनीवर कोसळण्याचे प्रकार घडतात.
- विशाल मोहिते, निसर्गप्रेमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com