घरातील बोलक्या भिंती
जुईनगर, बातमीदार
बदलत्या काळानुसार मानवी जीवनशैलीतही कमालीचा बदल झाला आहे. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर कुठल्या तरी माध्यमातून व्यक्त होण्याकडे कल वाढलेला आहे. अशातच आता घरातील भिंतीदेखील बोलू लागल्या असून नावीन्यतेमुळे विविध चित्रांमधून घराला घरपण देण्याकडे अनेकांचा कल आहे.
-------------------------------------
आपल्याला जर कोणी म्हटलं की भिंती बोलतात तर त्यावर विश्वासच बसणार नाही, पण एखादी दगड-मातीची भिंत जेव्हा रंगीत होते, तेव्हा ती जिवंत होऊन बोलू लागते. भिंतींच्या या रंगांमधून त्यावरच्या कलाकुसरीतून घरातील माणसांची ओळख होत असते. त्यामुळे ‘घर असावं घरासारखं नकोत नुसत्या भिंती’ ही कवितेची ओळ आजच्या काळातील घराच्या भिंतींना अगदी साजेशी आहे. रंगांशिवाय आपलं घर, आपलं आयुष्यच अगदी बेरंग झाल्यासारखं होईल. इतकं या रंगांचे आणि आपले घट्ट नाते आहे. भिंतींच्या सुशोभीकरणाचा जेव्हा विचार करतो, तेव्हा ती आकर्षक बनवण्यासाठी पूर्वापार लोकांनी त्यासाठी विविध रंग, नक्षी, लाकूड, कापड यांचा वापर केला आहे. या भिंतीवर आपल्या कलाकुसरीतून, त्या त्या काळच्या समाजजीवनाचा अनमोल ठसा तेव्हाच्या चित्रकारांनी, कलाकारांनी उमटवला आहे, पण सध्या सजावटीच्या या नवीन प्रकारात अनेक बदल झाले आहेत. कॅन्व्हासपासून फ्रेम केलेल्या प्रिंट्सपर्यंत भिंतींवर टांगलेल्या इतर कलात्मक अलंकारांचा समावेश आहे. तुमच्या घराची वॉलआर्ट तुमच्या खोलीची थीम रंगसंगती आणि तुमच्या वैयक्तिक शैलीवर अवलंबून असते, सध्या अनेकांच्या घरातील भिंतींवर वेलबुट्ट्या, पानं, फुलं, वारली यांची सुंदर चित्रे आणि तितकीच मोहक रंगकला केलेली पाहायला मिळते. तसेच लहान मुलांच्या खोलीमध्ये हत्ती, घोडा, हरिण अशी विविध प्राणी आणि खेळण्यांची चित्रे रेखाटलेली असतात. त्यामुळे घरातील भिंती सजवण्याचा नवा ट्रेंडच बनला असून सुंदर साध्या चित्रांपासून वारली, पुरातन काळातील चित्रे, नैसर्गिक देखाव्यांनी सजलेल्या भिंतींमुळे घराला घरपण आले आहे.
--------------------------------------------
टेक्श्चर पेंट्स
टेक्श्चर पेंट्स प्रचलित आहेत. उच्चारण भिंती तयार करण्यासाठी आदर्श आहेत. भौमितिक नमुने, फुलांचा आकृतिबंध, झाडाचे जीवन, पक्षी आणि वन्यजीव ते व्यंगचित्रांपर्यंत विविध रचना डिझाईन उपलब्ध आहेत.
----------------------------------------------
इमल्शन पेंट्स
इमल्शन पेंट्स पाणी किंवा तेलावर आधारित असतात. ते धुतले जाऊ शकतात आणि अशा प्रकारे, मुलांसह घरांसाठी योग्य आहेत. इमल्शन पेंट्स मखमली, साटन किंवा रेशीमसारख्या फिनिशमध्ये येतात. हे पेंट मनमोहक दिसतात. तसेच घर ऊबदार आणि आरामदायी करण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
-----------------------------------------------
तटस्थ रंगांचे संयोजन
ऋषी आणि निळ्या रंगाचे हे तटस्थ रंगसंयोजन घराच्या भिंती पेंटिंग डिझाईनसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे. हे शांत आणि आरामदायक मूड तयार करण्यात मदत करते. अनेक ठिकाणी भिंती सजवण्यासाठी आकर्षक नक्षीदार कार्पेटचादेखील वापर करतात. वुलन, आर्टिफिशियल, व्हिनाईल कार्पेटला जास्त मागणी आहे.
-------------------------------------------------
ग्रामीण भागातही प्रचलित
अनेक घरांमध्ये भिंतींना वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक डिझाईन काढतात; तर काही भितींना नक्षीदार कार्पेट लावून घराच्या भिंती बोलक्या केलेल्या पाहायला मिळतात. शहरी भागांसोबतच आता ग्रामीण भागातील घरांनादेखील अशाच प्रकारे सजवले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.