वंचित बहुजन युवक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष वॉर्ड अध्यक्षावर प्राणघातक हल्ला...... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वंचित बहुजन युवक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष वॉर्ड अध्यक्षावर प्राणघातक हल्ला......
वंचित बहुजन युवक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष वॉर्ड अध्यक्षावर प्राणघातक हल्ला......

वंचित बहुजन युवक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष वॉर्ड अध्यक्षावर प्राणघातक हल्ला......

sakal_logo
By

वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आणि वॉर्ड अध्यक्षावर प्राणघातक हल्ला

मुंबई, ता. २७ : वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष परमेश्वर रणशूर आणि वॉर्ड अध्यक्ष गौतम हराळ यांच्यावर शनिवारी (ता. २७) संध्याकाळी दादर येथील आंबेडकर भवन परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. अज्ञातांनी लोखंडी रॉड, तलवार आणि चॉपर घेऊन हल्ला केल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी दिली आहे. हा हल्ला म्हणजे आंबेडकर भवनावरचाच हल्ला आहे, असे आम्ही मानतो आणि त्याचा निषेध करतो. हल्ल्याला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, असे रेखाताई यांनी म्हटले आहे.
आज आंबेडकर भवनात वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेशच्या कार्यकर्त्यांची बैठक होती. पुढील सभा ३ जून रोजी होणार आहे. त्याची तयारी करण्यासाठी कार्यकर्ते जमले होते. सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान परमेश्वर रणशूर आणि गौतम हराळ यांच्यावर चार व्यक्तींनी लोखंडी रॉड, तलवार आणि चॉपरने जीवघेणा हल्ला केला, असे वंचित बहुजन आघाडीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.