वीजचोरी करणाऱ्या नऊ फार्महाऊसवर कारवाई

वीजचोरी करणाऱ्या नऊ फार्महाऊसवर कारवाई

कल्याण, ता. २८ (बातमीदार) : महावितरणच्या मुरबाड उपविभागात विशेष पथकाने शोधमोहीम राबवत नऊ फार्महाऊसची ३० लाख ४६ हजार रुपयांची वीजचोरी पकडली. या फार्महाऊसवर विनामीटर थेट वीजचोरी होत असल्याचे आढळून आले आहे.
वीजचोरींविरोधात स्थापन केलेल्या कल्याण मंडळ कार्यालयाच्या विशेष पथकाने मुरबाड उपविभागात २० फार्महाऊसच्या वीजपुरवठ्याची तपासणी केली. यात नऊ फार्महाऊसकडून वीजचोरी होत असल्याचे समोर आले आहे. यात चिराड येथील निसर्ग रेसॉर्ट, जोंधळे फार्महाऊस, मनोज पाटील फार्महाऊस, पंढरीनाथ गायकर फार्महाऊस, मुरबाड येथील ओंकार फार्महाऊस, शिरावली येथील अम्मा फार्महाऊस, लाके वूड फार्महाऊस, गवाली येथील समर्थ म्हात्रे फार्महाऊस, न्हावे येथील डॅडी भोईर फार्महाऊस या नऊ फार्महाऊसमध्ये विजेचा चोरटा वापर आढळून आला आहे. चोरीच्या विजेचे देयक आणि तडजोडीची रक्कम भरण्याबाबत संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या असून विहित मुदतीत रकमेचा भरणा न झाल्यास वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी फिर्याद देण्यात येणार आहे, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले. कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर आणि कल्याण मंडळ एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता जयश्री भोईर, सहायक अभियंते सुरज माकोडे, जयश्री कुरकुरे, दीपाली जावले, कर्मचारी किशोर राठोड, राजेंद्र जानकर, संतोष मलाये, विनोद गिलबिले, नितीन कुवर, आकाश गिरी, मधुकर चन्ने, सुभाष डोरे, संकेत मुर्तरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com