डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By

नवी मुंबई (वार्ताहर): पनवेल येथून बेलापूरच्या दिशेने स्कुटीवरून जाणाऱ्या तरुणाला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने धडक दिली होती. पनवेल-बेलापूर मार्गावरील गव्हाणफाटा येथे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून फरार डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेण येथील बौद्धवाडा कोळीवाडा राहणारा योगेश कोळी (२०) शुक्रवारी (ता.२६) कामानिमित्त आपल्या स्कुटीवरून पनवेल येथे आला होता. सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास पनवेल-गव्हाणफाटा मार्गे बेलापूर येथे जात असताना त्याची दुचाकी रस्त्यावरच घसरली होती. याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या डंपरने योगेशला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पळून गेला होता. त्यामुळे पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात उशिर झाल्याने योगेशचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पनवेल शहर पोलिसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.