
बुकी अनिल जयसिंघानीला अन्य एका गुन्ह्यांत अटक
बुकी अनिल जयसिंघानीला
अन्य एका गुन्ह्यात अटक
अंधेरी, ता. २९ (बातमीदार) ः मलबार हिल पोलिसांनंतर ईडीच्या ताब्यात असलेला बुकी अनिल जयसिंघानी याला अन्य एका गुन्ह्यात अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे. बोगस क्रमांक लावून कारचा वापर केल्याचा त्याच्यावर आरोप असून त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तक्रारदार हॉटेल व्यावसायिक असून ते उल्हासनगरमध्ये राहतात. अनिल जयसिंघानी त्यांचा व्यावसायिक मित्र होता; मात्र त्यांच्यात व्यावसायिक वाद झाला. अनिलने त्याला धमकी देण्यास सुरुवात केली होती. त्यांना खोट्या गुन्ह्यांत अटक व्हावी म्हणून त्याने एका महिलेच्या मदतीने गोव्यात तक्रारदाराविरुद्ध लैंगिक अत्याचाराच्या एका गुन्ह्याची नोंद करण्यास प्रवृत्त केले होते. गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी गोवा पोलिस मुंबईत आले होते. त्यांच्यासोबत अनिलही एका कारमध्ये होता. तपासात अनिलने बोगस क्रमांकावर कारचा वापर केल्याचे उघडकीस आले होते.