नवी मुंबईत विकासकामांचा धडाका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईत विकासकामांचा धडाका
नवी मुंबईत विकासकामांचा धडाका

नवी मुंबईत विकासकामांचा धडाका

sakal_logo
By

नेरूळ, ता. ३१ (बातमीदार)ः सुनियोजितपणे वसलेले शहर असा नावलौकिक असलेल्या नवी मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचे काम महापालिकेने केले आहे. याच अंतर्गत शहरातील नागरिकांना विविध सुविधा देण्यासाठी महापालिकेने विकासकामांचा सपाटा लावला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले.
नेरूळ येथील वंडर्स पार्कचे नूतनीकरण करण्यात आले आहे. नवी मुंबई शहराबरोबरच उरण, पनवेल, ठाणे, मुंबई या शहरातील नागरिकांसाठी विरंगुळ्याचे हे महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे या पार्कमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या आकर्षक खेळण्यांमुळे वंडर्स पार्क भविष्यात आकर्षणाचे केंद्र राहणार आहे. याचबरोबर केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत सांडपाणी केंद्रात येणाऱ्या दूषित पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने कोपरखैरणे येथे टर्शरी ट्रीटमेंट प्लांट उभारला आहे. या प्रकल्पातून दररोज २० एमएलडी पाणी शुद्ध केले जाणार असून तुर्भे एमआयडीसीतील ६ कंपन्यांमध्ये या पाण्याचा वापर केला जाणार आहे; तर वाचन संस्कृतीचा विकास करण्यासाठी पालिकेने सानपाडा सेक्टर ११ येथे भूखंड क्रमाक १ वर मध्यवर्ती ग्रंथालय उभारले आहे. या ग्रंथालयात वाचकांसाठी ब्रेल विभाग मराठी, हिंदी, इंग्रजीसह विविध भाषांतील साहित्य उपलब्ध राहणार आहे; तर गरीब, गरजूंसाठी सहा बहुद्देशीय इमारत व मंगल कार्यालय बांधण्यात आलेय. वाशी येथील बहुद्देशीय इमारतीचे लोकार्पण करण्यात आले आहे.
-----------------------------------------
नवी मुंबई हे अत्यंत सुनियोजितपणे वसलेले शहर आहे. या शहराचा विकास सिडकोने केला असला तरी त्यावर कळस चढवण्याचे काम नवी मुंबई महापालिकेने केले आहे. त्यामुळे शहरात नव्याने तयार होणारी ग्रंथालये, बहुउद्देशीय केंद्रे अत्यंत महत्त्वाची आहेत.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
---------------------------------------------
नवी मुंबईतील गावांची स्मार्ट व्हिलेज म्हणून ओळख होत आहे. यामुळे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांसाठी सरकारने योग्य पावले उचलावीत. प्रकल्पग्रस्तांची मुले आजही कायमस्वरूपी नोकरीत नाहीत. त्यामुळे बारवीप्रमाणे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची मुले नोकरीत कायमस्वरूपी करावीत.
- मंदा मात्रे, आमदार, भाजप
---------------------------------------------------
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी फार सोसले आहे. एमआयडीसी, सिडको यांना दिलेल्या जागांच्या पोटी महापालिकेत ३०० लोक कंत्राटी पद्धतीवर काम करतात. या प्रकल्पग्रस्तांना महापालिका, तसेच सिडकोमध्ये कायमस्वरूपी घेण्यात यावे.
- गणेश नाईक, आमदार, भाजप