कल्याणकारी योजना घरोघरी पोहोचवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणकारी योजना घरोघरी पोहोचवणार
कल्याणकारी योजना घरोघरी पोहोचवणार

कल्याणकारी योजना घरोघरी पोहोचवणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३१ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या भाजपच्या सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त ३० मे ते ३० जून या कालावधीमध्ये लोकसभानिहाय विशेष जनसंपर्क अभियान ''मोदी ॲट ९'' या शिर्षकाखाली देशभरात राबवण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजना कार्यकर्त्यांमार्फत घरोघरी पोहोचवणार असल्याचा निर्धार या वेळी आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचे भवितव्य उज्‍ज्वल असल्याचे मत नाईक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्तरावर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात या अभियानाची यशस्वीपणे अंमलबजावणी सुरू आहे. या पत्रकार परिषदेत ऐरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संदीप नाईक, महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती अनंत सुतार, भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत उपस्थित होते. मोदी सरकारचा नववर्षांचा कार्यकाळ आणि त्यापूर्वीच्या सरकारचा कार्यकाल या मधला फरक विषद करताना, पूर्वी शेवटच्या घटकापर्यंत विकास निधी पूर्णपणे पोहोचत नव्हता. मात्र मोदी सरकारच्या कार्यकाळात अगदी थेट लाभार्थीच्या बचत खात्यामध्ये हा निधी जमा होत आहे.
मोदी सरकारने ‘हर घर नल’ योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी नागरिकांना घरामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. विविध जलस्रोत निर्माण करून पाणीपुरवठा वाढवला. लाकडे जाळून चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांना उज्‍ज्वला योजनेतून ९.६ कोटी कुटुंबांना मोफत स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध करून दिला आणि त्यांचे आरोग्य राखले. जलयुक्त शिवार सारख्या योजनांमधून लाखो हेक्टर शेती सिंचनाखाली आणून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवले, असेही नाईक म्हणाले.

स्वयंरोजगाराला चालना
देशामध्ये एक लाखापेक्षा ही अधिक स्टार्टअप सुरू करून युवकांच्या हाताला स्वयंरोजगार दिला. देशातील मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योजकांना सक्षम करण्यासाठी एमएसएमई मंत्रालयाच्या माध्यमातून विविध योजना सुरू केल्या आहेत, अशी माहिती लोकनेते नाईक यांनी यावेळी दिली.