ठाणे मनोरूग्णालयातील सफाईसेवक बेमुदत संपावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे मनोरूग्णालयातील सफाईसेवक बेमुदत संपावर
ठाणे मनोरूग्णालयातील सफाईसेवक बेमुदत संपावर

ठाणे मनोरूग्णालयातील सफाईसेवक बेमुदत संपावर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ३१ : ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील सफाई सेवकांचे होणारे शोषण थांबवून, कामगारांना कायदेशीर वेतन, भत्ते आणि कायदेशीर सुविधा मागील फरकासह अदा न केल्यास बेमुदत आंदोलन करण्याबाबत रुग्णालय प्रशासनाला सफाई कामगारांनी लेखी नोटीस बजावली आहे. वारंवार कामगारांनी व श्रमिक जनता संघ युनियनने अर्ज-विनंत्या व निवेदने करूनही कामगारांच्या कायदेशीर व न्याय्य मागण्यांकडे रुग्णालय प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांनी दुर्लक्ष करून गेले सुमारे चार वर्षे सफाई कामगारांचे शोषण सुरू ठेवले आहे. शेवटी रुग्णालय प्रशासन व ठेकेदार यांच्या संगनमताला कंटाळून कामगारांनी सर्वानुमते बेमुद्दत आंदोलनाची भूमिका घेतली आहे. गेल्या चार वर्षांत कामगारांना कायदेशीर वेतन अदा केलेले नाही. दर सहा महिन्यांनी वाढणाऱ्या विशेष भत्त्याची रक्कम पगारात दिलेली नाही. कामगारांना सुरक्षा साहित्य म्हणून रेनकोट, छत्री, गमबूट, साबण, टॉवेल, मास्क, हॅंडग्लोव्ज आदी कधीही पुरविले नाहीत. येत्या १४ दिवसांत कामगारांच्या युनियनच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करून न्याय दिला नाही तर १४ दिवसानंतर सफाई कामगारांनी काही आंदोलन केल्यास त्यासाठी संबंधित ठेकेदार व रुग्णालय प्रशासन जबाबदार राहील, असे नोटिशीमध्ये म्हटले आहे.