कल्याण-डोंबिवलीतील आठ अनधिकृत शाळा

कल्याण-डोंबिवलीतील आठ अनधिकृत शाळा

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १ : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत शासनाची परवानगी न घेता सुरू करण्यात आलेल्या आठ प्राथमिक शाळा कल्याण-डोंबिवली पालिकेच्या शिक्षण विभागाने अनधिकृत म्हणून घोषित केल्या आहेत. तसेच या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन प्रशासनाधिकारी विजय सरकटे यांनी केले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका शिक्षण विभागाने पालिका हद्दीतील आठ प्राथमिक शाळा या अनधिकृत म्हणून घोषित केल्या आहेत. शासनाची परवानगी न घेता शाळा सुरू करण्यात आल्या असल्याने याला मान्यता नाही. त्यामुळे या शाळांत पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश अर्ज करू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या अनधिकृत शाळांच्या यादीत डोंबिवलीतील खंबाळपाडा येथील ओमकार इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई), ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई), ध. ना. चौधरी विद्यासंकुल; नांदिवली रोड डोंबिवली येथील डी. बी. एस. हिंदी अँड इंग्लिश स्कूल; आंबिवली पश्चिममधील विंबग्यार राईझ स्कूल (सीबीएसई); वसंत व्हॅली रोड कल्याण पश्चिमेतील ईकरा इंग्रजी स्कूल ॲंड मक्तब, सर्वोदय सृष्टी, कल्याण पश्चिम येथील लिटल वंडर प्रायमरी स्कूल, मांडा टिटवाळामधील दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल यांचा समावेश आहे.
या शाळा अनधिकृत घोषित केल्याने पालकांनी आपल्या मुलांना या शाळेत प्रवेश घेऊ नयेत. तसेच अधिकृत शाळेत प्रवेश घेण्यात काही अडचणी येत असतील तर पालकांनी पालिकेच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधावा, असे सरकटे यांनी आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com