वटपौर्णिमा निमित्त बाजारात फणसाची मोठी विक्री

वटपौर्णिमा निमित्त बाजारात फणसाची मोठी विक्री

वटपौर्णिमेनिमित्त बाजारात फणसाची मोठी विक्री

घाटकोपर, ता. १ (बातमीदार) ः वटपौर्णिमेनिमित्त कोकणातून मुंबईत फणस दाखल झाले आहेत. वटपौर्णिमेच्या वाणात आंब्यासह फणसाच्या गरांना मोठे महत्त्व आहे. घरात गोडधोड पदार्थ म्हणून स्त्रिया बरका फणसाच्या पोळ्या बनवतात. कापा फणस वाण भरण्यासाठी वापरतात. त्याच पार्श्वभूमीवर वटपौर्णिमेच्या तीन-चार दिवस आधीच कोकणातून मोठ्या प्रमाणात फणस शहरी बाजारात दाखल झाले आहेत.
घाटकोपरमध्ये शंकर पार्टे आणि पप्पू पार्टे दरवर्षी कोकणातील पोलादपूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात फणस आणून त्यांची विक्री करतात. यंदाही घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, बोरिवली, मुलुंड, चेंबूर, विलेपार्ले, अंधेरी, खार, कांदिवली, दादर आदी भागांत फणस मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. साधारण ६० ते १००-१५० रुपये अशी फणासाची किंमत आहे. वटपौर्णिमेच्या चार दिवस आधीच आम्ही कोकणातून हजारो फणस आणले. त्यातील साडेपाचशे फणसांची आतापर्यंत विक्री झाली, असे पप्पू पार्टे यांनी सांगितले.

घाटकोपर ः फणस खरेदी करताना महिला. (छायाचित्र : नीलेश मोरे)
--

जोगेश्‍वरीत जागोजागी फणस
जोगेश्‍वरी, ता. १ (बातमीदार) ः वटपौर्णिमेनिमित्त जेागेश्‍वरीतील सर्वोदय नगर मार्गावरील लालजी मल्‍होत्रा तंत्रनिकेतन महाविद्यालयाजवळील मोकळ्या जागेत जागोजागी फणस विक्रीसाठी ठेवण्यात आलेले दिसत आहेत. यंदा पावसामुळे फणस गळून पडला. त्‍यानंतर झाडाला कमी फणस लागल्‍याने कोकणातील कुडाळ आणि इतर जिल्ह्यांतून त्यांची आवक कमी प्रमाणात झाली. परिणामी शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत मिळणारा फणस यंदा दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत मिळत असल्याचे विक्रेते ज्ञानदेव पालव यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com