बेकायदा बांधकाम विरोधात भिक मांगो आंदोलन

बेकायदा बांधकाम विरोधात भिक मांगो आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. १ : कल्याण-डोंबिवली शहरात बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट आहे. पालिका प्रशासन, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या आशीर्वादाने ही बांधकामे होत आहेत. बेकायदा बांधकामांबरोबर शहरात सुरू असलेल्या काही बेकायदा धर्मस्थळांनाही अधिकारी पाठीशी घालत आहेत, असा आरोप करत गेल्या तीन वर्षांपासून ९०० दिवस पालिकेच्या विरोधात आंदोलन करणारे निर्भय बनो संस्थेचे संस्थापक महेश निंबाळकर यांनी गुरुवारी पुन्हा मानपाडा रस्त्यावर जाऊन ‘भीक मांगो’ आंदोलन केले. या बेकायदा बांधकामांच्या विरुद्ध न्यायालयात जाऊन लढण्याची आपली ताकद नाही. राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आपण हे आंदोलन करत आहोत, असे निंबाळकर यांनी सांगितले.
कल्याण-डोंबिवली शहरात बेकायदा बांधकामे उभी राहात आहेत. या बेकायदा बांधकामात घर घेऊन अनेक ग्राहकांची फसवणूक होत असतानाही अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. दरम्यान, शहरातील नागरिकांनी त्यांच्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. त्यांच्या हातामधील थाळीत नाणी, नोटा टाकून नागरिक हे पैसे पालिका अधिकाऱ्यांना पोहोचवा, असे सांगत होते. गेल्या तीन वर्षांच्या काळात फ प्रभाग कार्यालयात त्यांनी अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले होते. ९०० दिवस उपोषण सुरू असूनही शासन कल्याण-डोंबिवली पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करत नसल्याने शहरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com