पेणनजीक अपघातात सात जण गंभीर

पेणनजीक अपघातात सात जण गंभीर

पेण, ता. १ (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गावर पेणनजीक एचपी पेट्रोल पंपासमोरील ब्रीजवर बुधवारी (ता. ३१) रात्री १० वाजण्याच्या सुमारास सिमेंट मिक्सर ट्रक व कारचा भीषण अपघात होऊन ७ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे, खेडवरून मुंबईला कारने जात असताना सिमेंट मिक्सर ट्रकने कारला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारचालक दीपक उतेकर (वय ३३, रा. खेड), नम्रता कांबळे (वय २९, रा. करंजाडे पनवेल), ऋषभ अधिकारी (वय १०, रा. नालासोपारा), प्रणाली सावंत (वय ४५), वैशाली शिगवण (वय ३५), वनिता शिगवण (वय ६०) व आरोही शिगवण (वय १०, सर्व रा. सांताक्रूझ) हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघाताचे वृत्त समजताच कल्पेश ठाकूर यांनी रुग्णांना आपल्या रुग्णवाहिकेतून तात्काळ पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच पुढील उपचारासाठी पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पेण वाहतूक पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com