
‘रॉयलओक फर्निचर’ची बाजारपेठ विस्तारण्याचे उद्दिष्ट
मुंबई, ता. ३ : भारतातील आघाडीच्या फर्निचर ब्रँड ‘रॉयलओक फर्निचर’ची लवकरच मुंबई, उत्तर भारत तसेच पश्चिम भारतातील महत्त्वाच्या शहरांत १०० शोरूमची साखळी सुरू करण्यात येईल, अशी माहिती संस्थापकीय अध्यक्ष विजय सुब्रमण्यम यांनी मुंबईत दिली. भारतातील फर्निचरला जशी परदेशात मागणी आहे अगदी अशीच मागणी परदेशातील फर्निचरला असल्याने आम्ही खास, दर्जेदार टिकाऊ आणि घराला घरपण देणाऱ्या साजेशा वस्तूंची श्रेणी सादर केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
रॉयलओक फर्निचरतर्फे वॉर्ड रोब, किचन टेबल्स, कॉट्स, चेअर्स, टेबल्स, डायनिंग टेबल्स, सोफा कम बेड, टी पॉय, मिरर बॉक्स अशा एक ना अनेक विविध आकर्षक इंपोर्टेड इटालियन, अमेरिकन, मलेशियन, टर्कीश फर्निचर खिशाला परवडेल अशा किमतीत उपलब्ध होणार आहेत. शिवाय या फर्निचरला पाच वर्षांचा मेंटेनन्स वारंटी पिरियडही असणार आहे, असे सुब्रमण्यम म्हणाले. दरम्यान, घरात शुद्ध हवा, ताजेतवाने वातावरण निर्मितीसाठी उपयुक्त अशा सजीव रोपांची कुंड्यांची विक्रीही करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन प्लांट स्टोअर्स नर्सरी ‘उगाओ’ या भारतातील सर्वात मोठ्या नर्सरीसोबत करार करण्यात आला आहे.
‘आम्ही १०० फर्निचर शोरुमच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे सर्वोत्तम फर्निचर ग्राहकांना उपलब्ध करून देत आहोत. भविष्यात शाळा, महाविद्यालये तसेच सरकारी आणि खासगी आस्थापनांत दर्जेदार फर्निचर टेबल्स, खुर्च्या, कबट्स, मीटिंग रुम टेबल्स, पोडियम्स वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येतील, असेही सुब्रमण्यम यांनी सांगितले.