पनवेलमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा

पनवेलमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा

नवीन पनवेल, ता. ६ (वार्ताहर)ः पनवेलमधील अनधिकृत शाळांची यादी शिक्षण विभागाने प्रसिद्ध केली आहे. या यादीत तब्बल २४ शाळा बेकायदा असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे मुलांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी पालकांकडून होत आहे.
मुलांच्या शैक्षणिक आयुष्याच्या दृष्टीने पालक अनेकदा चांगली शाळा निवडण्यासाठी आग्रही असतात. त्यामुळे शाळा निवडण्याचे निकष विविध घटकांवर अवलंबून असतात, पण पाल्यांचे हित हाच एकमेव हेतू केंद्रस्थानी असल्याने वाटेल ती किंमत मोजून मुलांच्या शालेय प्रवेशासाठी पालक धावपळ करतात. पालकांच्या याच मानसिकतेचा फायदा घेत सध्या शाळांचे बाजारीकरण सुरू आहे; तर अनेक शाळा शासनाच्या परवानगीशिवायच चालवल्या जात असल्याने महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालकांनी नियमबाह्य शाळा बंद करून कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. पनवेलमध्येही एकूण २४ बेकायदा शाळा सुरू असून तीन शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
----------------------------------------------------
पनवेल परिसरातील बेकायदा शाळा
- मार्शमेलोज इंटरनॅशनल स्कूल (ओवे), सरस्वती विद्यामंदिर, केळसेकर इंग्लिश मीडियम स्कूल (तळोजा) पाचनंदअर्कम इंग्लिश स्कूल (तळोजा), वेदिक ट्री प्री स्कूल (करंजाडे), वेद ड्राप पब्लिक स्कूल (करंजाडे), विनायक आश्रय (करंजाडे), डॉल्फिन किड्स स्कूल (करंजाडे), ओसीन ब्राईट कॉन्हेंट स्कूल (तळोजा), वेदांत पब्लिक स्कूल (कळंबोली), ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल (कळंबोली), सेंट अन्योनी इंग्लिश स्कूल (करंजाडे)
- एस.जी.टी. इंटरनॅशनल स्कूल (करंजाडे), वेद गृह इंटरनॅशनल स्कूल (करंजाडे), ओझन्स इंटरनॅशनल स्कूल (कोळखे), प्लीजन्ट इंग्लिश स्कूल (सांगडे), एस.बी.पी. इंग्लिश स्कूल (शेडुंग), पायोनियर पब्लिक स्कूल (पारगाव), लिटल चॅम्प (ओवळे), एकलव्य स्कूल (ओवळे), नवजीवन इंटरनॅशनल स्कूल टोलनाका (आपटा फाटा), दि इंग्लिश स्कूल (उलवा), न्यू इंग्लिश स्कूल (कोपरा), रोहिंजण इंग्लिश स्कूल (रोहिंजण), आकृती एज्युकेशनल अँड वेल्फेअर सो. एस.एम.बी. इंटरनॅशनल स्कूल (उलवे)
-------------------------------------
करंजाडेमध्ये सर्वाधिक संख्या
पनवेलचे गट शिक्षण अधिकारी सीताराम मोहिते यांनी बेकायदा शाळांची शोधमोहीम केली होती. या वेळी करंजाडे वसाहतीमध्ये पाहणी केली असता सर्वच्या सर्व सहा शाळा बेकायदा असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे मोहिते यांनी पालकांची फसवणूक होऊ नये म्हणून पालकांनी मुलांना अधिकृत शाळांमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन केले आहे.
-------------------------
यादीतील शाळा या बेकायदा असून शासनाची कुठल्याही प्रकारची मान्यता घेतली गेलेली नाही. त्यामुळे पालकांनी या शाळांमध्ये पाल्यास दाखल करू नये, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात येत आहे.
- पुनीता गुरव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. रायगड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com