एक लाख झाडे लागवडीचे अंबरनाथ पालिकेचे उद्दिष्ट

एक लाख झाडे लागवडीचे अंबरनाथ पालिकेचे उद्दिष्ट

अंबरनाथ, ता. ६ (बातमीदार) : यावर्षी पावसाळ्यामध्ये शहरात एक लाख विविध प्रकारचे वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट अंबरनाथ नगरपालिकेने ठरवले आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आणि माझी वसुंधरा अंतर्गत नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून सोमवारी (ता. ५) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
अंबरनाथ नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांच्या मार्गदर्शनानुसार नगरपालिकेच्या १०० कामगारांनी रॅली काढली. या वेळी वृक्षलागवडीचे महत्त्व सांगण्यात आले. मोरिवली शाळा येथे रॅलीचा समारोप झाला. मोरिवली येथील मैदानात भारतीय प्रजातीची झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले. अशाच प्रकारे पाऊस पडल्यानंतर एक लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य आहे. यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करून शहरातील मोकळ्या जागांवर वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याचा मानस अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. शेळके यांनी व्यक्त केला. यामध्ये शाळेतील मुलांचाही सहभाग घेण्यात येणार आहे. जनजागृतीसाठी आयोजित कार्यक्रमामध्ये स्वच्छ सर्व्हेचे स्वच्‍छतादूत सलील जव्हेरी, पालिकेचे आरोग्य निरीक्षक, अधिकारी, न्यू डेक्कन स्कूलचे शिक्षक आणि विद्यार्थी, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सदस्य आणि मुले, अपर्णा योगा केंद्राच्या महिला स्वयंसेविका यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com