अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक
चेंबूर, ता. ६ (बातमीदार) ः अल्पवयीन मेहुणी घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या मेहुण्याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी आपल्या पत्नीसोबत गोवंडी येथील घरात राहतो. पीडित मेहुणी आपल्या बहिणीच्या घरी राहायला आली होती. शनिवारी रात्री पत्नी कामानिमित्त घराबाहेर गेली असल्याची संधी साधून आरोपीने आपल्या अल्पवयीन मेहुणीला धमकावून बलात्कार केला. भयभीत झालेल्या मुलीने ही बाब आपल्या बहिणीला सांगितली. त्यानंतर सरळ तिने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com