पर्यावरण दिनानिमित्त उद्यानाचे सुशोभीकरण

पर्यावरण दिनानिमित्त उद्यानाचे सुशोभीकरण

Published on

मुंबई, ता. ६ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ‘सनटेक फाऊंडेशन’च्या वतीने नायगाव पूर्वेतील तिवरी येथील उद्यान सुशोभीकरण उपक्रम राबवण्यात आला. फाऊंडेशनतर्फे तिवरी येथील ४५० चौरस मीटर बागेच्या विकासासाठी माती व खते उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय लॉन गवत, विविध उपयुक्त झाडे यामध्ये कॅलिआंद्रा ब्रेविप्स (पावडर पफ), टेकोमा स्टॅन्स (यलो बेल्स), मुर्राया पॅनिक्युलाटा (ऑरेंज जास्मिन), नेरियम ऑलिअँडर (स्वीट सेन्टेड इंडियन ऑलिंडर), हिबिस्कस व्हेरिगेटेड (जावाकुसुम) आदी झाडे पुरवण्यात आली आहेत. पर्यावरण व पर्यावरणानुकूल जीवनाला प्रोत्साहन देणाऱ्या सामाजिक कामांसाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असतो, असे फाऊंडेशनच्या अनुपमा खेतान यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com