कामगाराच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

कामगाराच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ६ : डोंबिवली पूर्वेतील रुणवाल माय सिटी गृह प्रकल्पाच्या बांधकाम ठिकाणी खड्ड्यात पडून लिफ्टचे काम करणाऱ्या एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना गत गुरुवारी घडली होती. या ठिकाणी संरक्षक अडथळा निर्माण केला नसल्याने पियूषकुमार चौधरी (वय २०) या कामगाराचा तेराव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्याक आला आहे. या प्रकरणात फिर्यादी गौरव चौधरी याला पियूष कुमार हा लिफ्टच्या खड्ड्यात पडलेला आढळला. त्याने तातडीने याची माहिती सेफ्टी ऑफिसरला दिली. त्यांनी व इतर कामगारांनी तेथे जाऊन पाहिले असता हा मृत कामगार पियूष कुमार असल्याचे सांगितले. दरम्यान इमारतीच्या तेराव्या माळ्यावर लिफ्टच्या बाजूला विकासकाने संरक्षित अडथळा उभा केला नसल्याने पियूष लिफ्टच्या खड्ड्यात पडला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. यामुळे फिर्यादीच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिस उपनिरीक्षक शाहू काळदाते या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com