दोन दुचाकी आणि एका रिक्षाच्या अपघातांत दोघांचा मृत्यू

दोन दुचाकी आणि एका रिक्षाच्या अपघातांत दोघांचा मृत्यू

कासा, ता. ६ (बातमीदार) : डहाणू-नाशिक राज्य मार्गावर दोन दुचाकी आणि एका प्रवासी रिक्षाचा भीषण अपघात झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे; तर रिक्षामधील तिघांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. डहाणू-कासा राज्य मार्गावर रिक्षाला ओव्हरटेक करत पुढे जाणाऱ्या दुचाकीची समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली. दरम्यान, या दोन्ही दुचाकींना पाठून येणाऱ्या रिक्षाची पुन्हा जोरदार धडक बसून हा भीषण अपघात झाला, यामध्ये दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला असून एका दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली. त्याने हेल्मेट घातल्यामुळे त्याचा जीव वाचला; तर रिक्षामध्ये प्रवास करणाऱ्या तिघांना किरकोळ दुखापत झाली. या वेळी डहाणू पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना तात्काळ कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. यामध्ये रिक्षाचालक दिलीप वरठा, राजेश मोर व एक प्रवासी असून मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या अपघाताचा डहाणू पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com