डोंबिवलीत गवळण स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोंबिवलीत गवळण स्पर्धा
डोंबिवलीत गवळण स्पर्धा

डोंबिवलीत गवळण स्पर्धा

sakal_logo
By

डोंबिवली, ता. ७ : श्रीकला संस्कार न्यास यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त भजनभूषण दिवंगत नलिनी जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारूड व गवळण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार १ जुलैला सायंकाळी ४ वाजता आनंद बालभवन, डोंबिवली पूर्व येथे ही स्पर्धा होणार आहे. महिला मंडळासाठी ही स्पर्धा खुली असून भारुड व गवळण हे दोन्ही प्रकार सादर करणे बंधनकारक असेल. यासाठी २० जूनपर्यंत आपली नाव नोंदणी स्पर्धकांनी करावी. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक देण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.