पवई तलावात संगीत कारंजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पवई तलावात संगीत कारंजे
पवई तलावात संगीत कारंजे

पवई तलावात संगीत कारंजे

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ ः नागपूर येथील फुटाळा तलावाच्या धर्तीवर पवई तलावात मुंबई महापालिकेतर्फे संगीत कारंजे उभारण्यात येतील. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया करण्याचे निर्देश पालिकेला देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे चांदिवलीतील रुग्णालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात दिली.
पालिकेच्या वतीने चांदिवली, साकीनाका येथील संघर्षनगर भागात २९० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय तसेच क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या वेळी शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार दिलीप लांडे, आमदार भरत गोगावले उपस्थित होते. लांडे यांनी पवई तलाव हे पूर्व उपनगरातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून तलावात संगीत कारंजे उभारणे आवश्यक असल्याचा मनोदय व्यक्त केला. त्यास मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पालिका आयुक्तांना लक्ष देण्यास सांगितले.
.....
कुर्ल्यात ४८ दरडग्रस्तांना घरे
घाटकोपर येथील असल्फा व्हिलेजमध्ये दरडींच्या धोका आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात येथे दरड कोसळून दुर्घटना झाली होती. ही बाब लक्षात घेऊन या भागातील ४८ कुटुंबीयांना कुर्ला एचडीआयएल संकुलात कायमस्वरूपी घरे देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. जोरदार पावसात मिठी नदीला पूर आल्यानंतर येथील बाजूच्या वसाहतीत पाणी भरते. येथील क्रांतिनगर, संदेशनगर भागातील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागते. येथील रहिवाशांनाही एचडीआयएल संकुलात घरे देण्यात आली आहेत. या घरांचा काही वर्षांपासून वापर नसल्याने दुरुस्तीची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून ८५ कोटी रुपये दिले जातील, अशी घोषणाही या वेळी मुख्यमंत्र्यांनी केली.