मुंब्‍य्रातून मुस्लिम भोंदूबाबाला अटक

मुंब्‍य्रातून मुस्लिम भोंदूबाबाला अटक
Published on

नालासोपारा, ता. १३ (बातमीदार) : वसईतील धर्मांतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. धर्मांतराऐवजी माझ्या अंगात दैवी शक्ती आहे, असे सांगून हिंदू धर्मातील देवीदेवतांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी मुंब्रा येथून एका मुस्लिम भोंदूबाबाला माणिकपूर पोलिसांनी अटक केली आहे. मोहसीन सोनी असे गुन्हा दाखल झालेल्या मुस्लिम भोंदूबाबाचे नाव असून तो मुंब्रा येथील राहणारा आहे.
मुंब्रा परिसरातून ४०० हिंदूंचे मुस्लिम धर्मपरिवर्तन झाले आहे, अशी बातमी आल्यानंतर त्यात वसईच्या साईनगर येथे राहणाऱ्या जानी या हिंदू कुटुंबीयांनी त्याला दुजोरा दिला होता. राजेश जानी यांनी मुस्लिम धर्म स्वीकारल्याचे सांगितले होते. तसेच राजेश जानी याचे नावही बदलून मोहम्मद रियाज असे ठेवले होते. राजेश जानी हा वसईतून २५ मे रोजी बेपत्ता झाला होता. त्यानंतर मुंब्रा येथील आरोपी भोंदूबाबा हा जानी कुटुंबाला वारंवार फोन करत होता. याबाबतची एक ऑडिओ क्लिपही समोर आली होती. देवांग जानी यांच्या तक्रारीवरून परिमंडळ २च्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, माणिकपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपतराव पाटील यांनी आरोपी मोहसीन सोनी यांच्याविरोधात सोमवारी रात्री उशिरा वसईच्या माणिकपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

------------------
भीतीदायक वक्तव्य
राजेश जानी यांचा १८ वर्षांचा मुलगा देवांग जानी याला मोहसीन सोनी याने फोन करून त्याने तुझ्या वडिलांनी इस्लाम कबुल केला आहे. माझ्या अंगात दैवी शक्ती आहे, असे सांगत मुस्लिम धर्माचे महत्त्व पटवून दिले. तसेच हिंदू देवीदेवतांविषयी त्याने अवमानकारक, बदनामीकारक वक्तव्य करून धर्मपरिवर्तित झालेले राजेश जानी यांचा मुलगा देवांग जानी यांच्या मनात भीती निर्माण होईल, असे वक्तव्य केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com