ग्रामीण भागात १०८ रुग्णवाहिका वरदान

ग्रामीण भागात १०८ रुग्णवाहिका वरदान

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : नैसर्गिक आपत्ती असो, रस्ते अपघात असो, प्रसूतीच्या काळात खेड्यापाड्यांवर रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध होणे कठीण असते. अशा आणीबाणीच्या काळात शासनाच्या माध्यमातून आपत्कालीन स्थितीमध्ये रुग्णांना मोफत व जलद वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी १०८ रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार मे या एका महिन्यात ग्रामीण भागातील तीन हजार ९०० रुग्णांना सेवा देण्यात आली आहे. त्यामुळे ही रुग्णवाहिका ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना वरदान ठरू लागली आहे.
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जखमी झालेल्या रुग्णांना मोफत व जलद वैद्यकीय मदत मिळावी यासाठी २०१४ मध्ये १०८ रुग्णवाहिकेची सेवा सुरू केली. आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरू करण्यात आली आहे. अपघातग्रस्तांना लगेचच आवश्‍यक प्राथमिक उपचार मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचले आहेत. आतापर्यंत विविध १३ प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन स्थितीतील रुग्णांना वेळेत उपचार मिळाले आहेत. रस्ता अपघात, नैसर्गिक आपत्ती, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला ‘गोल्डन अवर’ मध्ये उपचार मिळण्यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिकेची ही सेवा रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना तत्काळ मदत मिळून प्राण वाचविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्ते अपघाताच्या वेळी असो, इमारत कोसळून होणाऱ्या दुर्घटनेच्या वेळी असो, पूरपरिस्थितीत रुग्णांना सेवा देण्यात प्रमुखची भूमिका १०८ रुग्णवाहिका बजावत असते.
......
अपघातील ६९ जखमींची सेवा
जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकट्या मे महिन्यात तीन हजार ९०२ रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेची सेवा पुरविण्यात आली आहे. यामध्ये रस्ते अपघातातील ६९ रुग्णांना, वैद्यकीय उपचारासाठी सर्वाधिक २ हजार ९२२ रुग्णांना, ४१४ गर्भवतींना, हृदयरोगाच्या ६१ रुग्णांसह आदी आजारातील रुग्णांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com