कोकण रेल्वेत तरुणीचा विनयभंग

कोकण रेल्वेत तरुणीचा विनयभंग

रोहा, ता. १४ (बातमीदार) ः कोकण रेल्वेतून प्रवास करताना तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तरुणीने तक्रार केल्यानंतर आरोपी देवेंद्र पेठे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बेल्हेकर पुढील तपास करत आहेत.
कुडाळ ते दादर कोकण रेल्वेत पीडित तरुणी ११ जून रोजी प्रवास करत होती. गाडी रोहा स्थानकावर थांबली असता विरार येथील देवेंद्र पेठे याने तरुणीशी लगट सुरू केली. गाडी एक तास थांबली आहे, आपल्याकडे वेळ आहे असे बोलत आरोपीने पीडितेशी असभ्य वर्तन केले. तरुणीने पोलिस ठाण्यात याबद्दल तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पण या घटनमुळे रेल्वेत महिलांच्या सुरक्षित प्रवासाचा मुद्दा समोर आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com