अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नालासोपारा, ता. १४ (बातमीदार) : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. नालासोपारा पूर्व पेल्हार परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी पेल्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी चोवीस तासांत अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन आरोपीलाही ताब्यात घेतले. मंगळवारी मध्यरात्री आरोपीला अटक करण्यात आली. अरबाज नईम बेग (वय २०) असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी हा माहीमच्या लोहार चाळीतील रहिवासी आहे. अल्पवयीन मुलीला लग्नाचे प्रलोभन दाखवून तिला घेऊन तो ७ जून रोजी निघून गेल्याचे सांगितले जात आहे. मुलीच्या वडिलांनी तिचा शोध घेतला असता ती सापडली नाही. तेव्हा त्यांनी पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार केली. मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले. या पथकाने तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन घेऊन मंगळवारी सायंकाळी आरोपीसह मुलीला माहीम परिसरातून ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आरोपीचा चौकशी केली असता त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचे उघड झाले. मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणात वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत लब्दे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे प्रभारी महेंद्र शेलार यांनी तपास केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com