नवीन पनवेलकरांना वाहतुकीचा फेरा

नवीन पनवेलकरांना वाहतुकीचा फेरा

नवीन पनवेल, ता. १४ (वार्ताहर)ः पनवेल रेल्वे ट्रॅकच्या दुपदरीकरणाचे काम सुरू झाल्याने तक्कामार्गे विचुंबे, नवीन पनवेलकडे; तर नवीन पनवेल-विचुंबेमार्गे पनवेल, तक्काकडे येण्या-जाण्यासाठीचा भुयारी मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पनवेल पूर्व भागातील नागरिकांचा पावसाळा वाहतूक कोंडीतून जाणार असून प्रवेशबंदीमुळे नवीन पनवेलमध्ये जाण्यासाठी विविध समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
पनवेल शहराच्या पूर्व भागाचाही मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. रेल्वे मार्गामुळे पूर्व भागाला जोडण्यासाठी दोन पूल तसेच एक भुयारी मार्ग सध्या अस्तित्वात आहे, परंतु काही ना काही कारणास्तव रस्ते बंद करावे लागल्याने पनवेल पूर्व भागातील नागरिकांना दररोज वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. अशातच पनवेल रेल्वे पुलाच्या दुपदरीकरणासाठी तक्का भुयारी मार्ग बंद करण्यात आल्याने विचुंबे, पोदी, नवीन पनवेलच्या भागातील नागरिकांना मोठा वळसा घालावा लागणार आहे.
-------------------------------
रेल्वे पुलावर वाहतुकीचा ताण
नवीन पनवेलमधील फायर ब्रिगेड, एचडीएफसी सर्कल या मार्गाने पनवेल बस स्थानक व नवीन पनवेल एचडीएफसी सर्कलवरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे बंद पुलाच्या रहदारीचा ताण पडून नवीन पनवेल रेल्वे पुलावर वाहतूक कोंडी होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पनवेल शहर वाहतूक शाखेतर्फे केले आहे.
----------------------------------
वाहतुकीसाठीचे पर्याय
- तक्का गाव ते विचुंबेकडे जाणारा भुयारी मार्ग व विचुंबे गाव, नवीन पनवेल ते शिवशंभो नाक्याकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे प्रवेशबंदी करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंच्या वाहतुकीस हा मार्ग तीन महिने पूर्णपणे बंद राहणार आहे. विचुंबे-नवीन पनवेल रेल्वे स्टेशन-फायर ब्रिगेड-एचडीएफसी सर्कल-नवीन पनवेल सिग्नलमार्गे पर्यायी मार्ग आहे.
- दुसरा पर्यायी मार्ग पनवेल रेल्वे स्टेशन-आंबेडकर पुतळा- एसटी स्टँड-नवीन पनवेल सिग्नल- एचडीएफसी सर्कल- फायर ब्रिगेड- नवीन पनवेल रेल्वे स्टेशन या मार्गे नागरिक इच्छित स्थळी जातील किंवा नाइलाजास्तव खांदा कॅालनी येथूनही मोठा वळसा घालावा लागणार आहे.
-----------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com