मुंबई म्हाडा मंडळातर्फे आज वेबिनार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई ता. १६ : म्हाडा मुंबई मंडळाच्या ऑनलाईन सोडतीसाठी अर्जप्रक्रिया सुरू आहे. या सोडतीत अनेक अर्जदारांना नवीन प्रक्रियेनुसार अर्ज भरण्यासाठी अडचणी येत असल्याच्या तक्रारी म्हाडाकडे प्राप्त झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर म्हाडाच्या ऑनलाईन सोडतींसाठी अर्जदारांना अधिक सुलभतेने अर्ज सादर करता यावा, याकरिता म्हाडा मुंबई मंडळातर्फे ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता. १७) सकाळी ११ वाजता लाईव्ह वेबिनार आयोजित करण्यात आले आहे. मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतील ४०८२ सदनिकांच्या विक्रीसाठी २२ मेपासून म्हाडाचे संकेतस्थळ व मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. म्हाडाच्या सोडतीसाठी यापूर्वी व सध्या चालू असलेल्या सोडतीसाठी ज्या अर्जदारांनी नोंदणी केली आहे, त्यांनी lottery-webinar.mhada.gov.in या लिंकवर जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच म्हाडाच्या सोडतीसाठी नोंदणी केलेल्या अर्जदारांना एसएमएसद्वारे व म्हाडाच्या संकेतस्थळावरही या लाईव्ह वेबिनारची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. इच्छुक अर्जदारांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

