वाढदिवसाचे बॅनर काढल्यामुळे आमदार गायकवाड संतप्त

वाढदिवसाचे बॅनर काढल्यामुळे आमदार गायकवाड संतप्त

Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १६ : कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला आहे. आमदार गायकवाड यांना शुभेच्छा देणारे बॅनर त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी लावले होते. वाढदिवस कार्यक्रम पार पडल्यानंतर केडीएमसीच्या वतीने हे बॅनर काढले आहेत. बॅनरवर कारवाई होताच आमदार पालिका अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले असून त्यांनी थेट प्रभागात जात पालिका अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार केला.
‘माझे बॅनर काढले, अभिनंदन... कायदा फक्त आमदार गणपत गायकवाड यांनाच का?’ असा सवाल या वेळी आमदार गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना केला. इतर बॅनर आहेत तसेच आहेत, त्यावर कारवाई कधी होणार, असेही त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना विचारले. मुख्य कार्यालयात तक्रारी आल्या होत्या, त्यामुळे कारवाई केल्याचे उत्तर प्रभाग अधिकाऱ्यांनी दिले.

---------------
राजकीय हेतूने तक्रारी
राजकीय हेतूने तक्रारी केल्या जातात. अदृश्य शक्तीच्या सांगण्यावरून फक्त माझ्या बॅनरवर कारवाई होते, असा टोला नाव घेता आमदार गायकवाड यांनी मित्र पक्षाला लगावला. मी पण अनेक तक्रारी केल्या आहेत, त्या बॅनरवरही कारवाई करा. शहर स्वच्छतेकडे लक्ष द्या. त्याचबरोबर पावसाळा आला आहे, नालेसफाईकडे लक्ष द्या, असे आमदारांनी या वेळी अधिकाऱ्यांना सुनावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com