महाबँकेकडून ६ हजार कोटींचे कर्जवाटप
मुंबई, ता. १६ ः ग्राहकांशी संपर्क ठेवण्यासाठी व ग्राहकांची मते जाणून घेण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे आज (ता. १६) ग्राहक संपर्क मेळावा घेण्यात आला. यात सामान्य, कृषी, एसएमई, कंपनी आदी ग्राहकांना सहा हजार नऊशे कोटी रुपयांची कर्जे देण्यात आली. बँकेचे कार्यकारी संचालक आशीष पांडेय यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.
ग्राहकांशी थेट संपर्क साधणे, त्यांच्या सूचना आणि मते मागवणे, त्यांना बँकेची सर्व माहिती देणे, त्यांच्या अपेक्षा समजावून घेणे व त्यानुसार आपल्या कामात सुधारणा करणे, यासाठी देशभर असे ग्राहक मेळावे आयोजित केले जातात. मागील वर्षी घेतलेल्या अशा मेळाव्यात एकंदर वीस हजार कोटींची कर्जे लहान मोठ्या ग्राहकांना देण्यात आली. याप्रसंगी आज हजर असलेल्या महिला उद्योजक ग्राहकांनीही अत्यंत चांगल्या कल्पना दिल्या. या वर्षी देशात असे शंभर मेळावे होतील, असेही ते म्हणाले.
या वेळी प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना आणि अटल पेन्शन योजना यांच्यातही बावीस हजार लोकांना समाविष्ट करण्यात आले. तसेच सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आणि सुकन्या समृद्धी योजना यांचीही सुमारे दोन हजार खाती उघडण्यात आली. त्याचबरोबर ९,७५० खातेदारांना इंटरनेट बँकिंग व मोबाईल बँकिंगची सुविधाही देण्यात आली.
-------
नोकरभरती होणार
पुणे येथे स्टार्टअप ग्राहकांसाठी वेगळी शाखा उघडली असून त्याचे कामही चांगले सुरू आहे. मुंबईत व इतरत्रही स्टार्टअप शाखा लवकरच उघडण्याबाबत तयारी सुरू आहे. यावर्षी बँकेच्या कर्ज व्यवसायात पंचवीस टक्के वाढ अपेक्षित आहे, तर ठेवींमध्ये पंधरा टक्के वाढ अपेक्षित आहे. नोकर भरतीअभावी बँकेच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचा कर्मचारी संघटनांचा आरोप आहे. या वर्षात आठशे वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे भरली जातील, असेही पांडे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

