कांदिवलीत विवाहित महिलेचा विनयभंग

कांदिवलीत विवाहित महिलेचा विनयभंग

Published on

अंधेरी, ता. १६ (बातमीदार) ः गेल्या तीन वर्षांपासून सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका ४३ वर्षांच्या महिलेशी जवळीक निर्माण करून तिच्याशी अश्‍लील वर्तन करून तिचा विनयभंग केल्याची घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी विनोद वर्मा याच्याविरुद्ध समतानगर पोलिसांनी आज गुन्हा नोंदविला आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने लवकरच पोलिस विनोद वर्मा यांची चौकशी करणार आहेत. तक्रारदार महिला तिच्या पती आणि मुलासोबत कांदिवलीतील एका पॉश सोसायटीमध्ये राहते. याच सोसायटीमध्ये विनोद राहत असल्याने ते दोघेही एकमेकांना ओळखतात. कोरोना काळात तयार केलेल्या व्हाट्सॲप ग्रुपमध्ये विनोदने या महिलेला सामील करून घेतले होते. त्यानंतर रात्री-अपरात्री तिला मॅसेज करून त्रास देत असल्याने महिलेने मोबाईल क्रमांक ब्लॉक केला होता. याचा राग आल्याने सातत्याने पाठलाग करून मानसिक त्रास देत होता. या महिलेकडे बघून अश्‍लील इशारे करून तिचा विनयभंग करत होता. या प्रकाराला कंटाळून या महिलेने विनोद वर्माविरुद्ध समतानगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com