... अन्यथा मुख्यालयासमोर कचरा टाकणार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : पावसाळ्यापूर्वी ठाणे शहरातील नालेसफाई काही ठिकाणी समाधानकारक; तर काही ठिकाणी असमाधानकारक करण्यात आली आहे. यावरून ठेकेदारांना काळ्या यादीत टाकत पालिका आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला. मात्र, दुसरीकडे कळवा-मुंब्रा परिसरातील नाल्यांची सफाई झालीच नसल्याचे विदारक चित्र आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जीपीएस लोकेशनसह फोटो ट्विट करत समोर आणले आहे. त्यामुळे या परिसरातील नाल्यांची सफाई वेळेत न झाल्यास नाल्यातील कचरा महापालिका मुख्यालयासमोर टाकू, असा इशारा त्यांनी या वेळी दिला.
कळवा, मुंब्य्रात कुठेही नालेसफाई झाली नसल्याचे आयुक्तांना यापूर्वीच सांगितले होते; परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पहिल्याच पावसात नालेसफाईची पोलखोल झाल्याचे दिसून आले आहे. कळवा पूवेर्तील भास्कर नगर, पौंडपाडा, वाघोबा नगर या परिसरामध्ये रहिवाशांच्या घरासमोर नाल्यातील कचरा आल्याचे दिसून आले; परंतु त्यानंतरही अद्यापही कार्यवाही झालेली नाही. उत्कर्ष आर्या नावाचा कोणी ठेकेदार आहे हे माहीत नाही, त्याला कामाचा किती अनुभव आहे हे माहीत नाही, तो कामदेखील करत नाही. त्यामुळे वेळीच हे नाले साफ करून दिले नाही तर एक दिवस हाच कचरा महापालिका मुख्यालयासमोर टाकला जाईल, असा इशाराही आमदार आव्हाड यांनी दिला आहे.
..........................
गेल्या अनेक महिन्यांपासून मी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घेत असलेल्या भूमिकेमुळे माझ्या मतदारसंघातील कामे होत नाहीत. विकासकामांसाठी आलेला निधीदेखील वळता करण्यात आला आहे. आता नालेसफाईची कामेदेखील केली गेलेली नाहीत. असे असले तरी मी जनतेची कामे करत राहणार आहे.
- जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

