अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक

अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक

Published on

कळवा, ता. १६ (बातमीदार) : शिवसेना ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक आयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक करण्यात आली. कळव्यातील जयभिमनगर परिसरात शुक्रवारी (ता १६) ला रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली.
कळव्यातील जयभिमनगर येथे शुक्रवारी सायंकाळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे उपस्थित राहणार आहेत. मी कळव्यातील शिवसेना ठाकरे गटाची पदाधिकारी बोलत असून आपण उपस्थित राहावे, असे खोटे आमंत्रण शिवसेना ठाकरे गटाच्या महिला राज्य समन्वयक आयोध्या पोळ यांना देण्यात आले. पोळ घटनास्थळी आल्यावर त्यांना घेराव घालून त्यांच्यावर शाईफेक व त्यांना धक्काबुक्की करत मारहाण करण्याची घटना घडली. या संदर्भात पोळ यांनी या घटनेमागे शिंदे गटाचे शिवसैनिक असल्याचा आरोप करत कळवा पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री पोळ व कळव्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, पोळ यांच्यावर शाईफेक व धक्काबुक्कीची घटना घडल्याचे वृत्त समजताच ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी कळवा पोलिस ठाण्यात गर्दी केली; तर पोळ यांनी शिंदे गटावर या घटनेचा आरोप केल्याने शिंदे गटाचे शिवसैनिक पोलिस ठाण्या समोर जमा झाल्यावर तेथेही शाब्दिक चकमक झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com