जुचंद्रच्या विकासासाठी लवकरच सहा कोटींचा निधी

जुचंद्रच्या विकासासाठी लवकरच सहा कोटींचा निधी

Published on

विरार, ता. १८ (बातमीदार) : वसई विरार महापालिकेतील प्रभाग समिती जी अंतर्गत नायगाव पूर्वेतील जुचंद्र विभागाचे झपाट्याने नागरीकरण होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे प्रभाग क्र. ११५ मधील विभागनिहाय विविध विकासकामांसाठी सहा कोटींच्या निधी मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये विविध विकासकामे टप्प्याटप्प्याने केली जाणार असल्याचे माजी सभापती कन्हैया भोईर यांनी सांगितले.

प्रभाग क्र. ११५ मधील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी माजी सभापती कन्हैया भोईर यांनी महापालिकेचे प्रशासक अनिलकुमार पवार यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. जुचंद्र येथील गांधी तलाव विकसित करणे, गजानन नगर येथे पाईप गटार व पेव्हरब्लॉक बसवणे, सहयोग बिल्डिंग ते गिरिजा म्हात्रे शाळेपर्यंत गटार व रस्ता तयार करणे, गांधी तलाव ते हनुमान मंदिरापर्यंत पाईप गटार व रस्ता काँक्रीटीकरण करणे, गिरिजा म्हात्रे शाळेपासून रेल्वेलाईन व गिरिजा म्हात्रे शाळा ते साई सिद्धेश्वर चाळ रस्ता डांबरीकरण करणे, जुगनू अण्णा ते सिद्धी चाळपर्यंत पेव्हर ब्लॉक बसवणे, साने गुरुजी मार्ग मातोश्री बिल्डिंगजवळ गटार टाकणे, जुचंद्र गावातील अंतर्गत रस्ते दुरुस्ती व काँक्रीटीकरण करणे या कामांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.